सागर पाटील, कळंबा प्रतिनीधी
Satej Patil News : ग्रामपंचायतमध्ये सध्या उपसरपंच बदलाच्या हालचाली सुरु आहेत. विद्यमान उपसरपंच उदय जाधव यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने सध्या उपसरपंचपदी आपली वर्णी लागावी यासाठी चार ते पाच ग्रामपंचायत सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामधून सत्ताधारी आमदार सतेज पाटील गटाच्या सदस्यांमध्ये धूतसफूस निर्माण झाली असून गट फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे उपसरपंच निवडी दरम्यान सदस्यांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा विरोधी महाडिक गट घेण्याची शक्यता आहे .
कळंबा ग्रामपंचायत सत्ताधारी गटातच सुरू असलेल्या नाराजी नाट्याने ग्रामपंचायतीत सत्तांतरांचे संकेत मिळू लागले आहेत. सत्तांतर सत्ताधारी गटातील पाच सदस्य फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहा वर्षानंतर प्रथमच या ग्रामपंचायतीत बिगर काँग्रेस सत्ता येण्याची शक्यता वाढली आहे. राज्यातील सत्तांतर नाट्य आता कळंबा ग्रामपंचायत निवडणुकीतही दिसून येत आहे.
कळंबा ग्रामपंचायतमध्ये सध्या आमदार सतेज पाटील अर्थात राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता आहे. सहा महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. येथे निवडणुकीत काँग्रेसची 13 तर भारतीय जनता पक्षाला 4 जागा मिळाल्यात. सध्या राष्ट्रीय काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच आहेत. काही दिवसांपूर्वी उपसरपंच उदय जाधव यांनी राजीनामा दिल्याने सध्या हे पद रिक्त आहे. त्यामुळे उपसरपंचपदी आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुक चार ते पाच ग्रामपंचात सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामधून सत्ताधारी गटाच्या सदस्यांमध्ये धूसफूस वाढली आहे. ग्रामपंचायतीत काँग्रेस अंतर्गत नाराजी नाट्य वाढले आहे. त्याला विरोधी गटाकडून अधिक बळ मिळत असल्याची चर्चा आहे. त्यातून सत्ताधारी गट फूटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा विरोधी घट घेण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









