बेळगाव : बेंगळूर येथील डॉलर्स कॉलनी येथे अलतगा, अगसगा, म्हाळेनट्टी हंदिगनूरच्या कार्यकर्त्यांनी व लोकप्रतिनिधींनी मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेवून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला. कर्नाटक विधानसभा निवडणूक संपल्यानंतर टॉपटेन मधील मताधिक्मयाने आलेले सतीश जारकीहोळी यांना मंत्री दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणून वऊणा क्षेत्राचे आमदार सिद्धरामय्या यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून कणकपुराचे आमदार डी. के. शिवकुमार यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर आमदार सतीश जारकीहोळी यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यमकनमर्डी मतदारसंघातील त्यांचे कार्यकर्ते व नेते तसेच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी बेंगळूर येथील त्यांच्या डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी अलतगा, अगसगा, म्हाळेनटी हंदिगनूर गावचे ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी भेट घेतली. यावेळी ग्रा. पं. सदस्य अप्पयागौडा पाटील, अमृत मुद्देणवर, चेतक कांबळे, गुंडू कुरेन्नावर, कल्लाप्पा पाटील, निंगाप्पा नाईक, सुधीर गडकरी, बसवाणी बागानल, बाळू हनडेणांवर, पुंडलिक पाटील, सुरेश तिरमाळे, राहुल जाधव, चन्नाप्पा नाईक, लगमा नाईक, यल्लाप्पा कांबळे, वामन कंग्राळकर आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री जारकीहोळी यांनी सर्वांनी जे सहकार्य केले त्यांच्याबद्दल आभार मानले.
Previous Articleमनपा कार्यालयातील शौचालयाची दुरवस्था
Next Article मार्कंडेय नदीतील गाळ तातडीने काढा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









