24 वी व्हीटीयू आंतर तांत्रिक महाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धा

बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक महाविद्यालय आयोजित 24 व्या व्हीटीयू आंतर तांत्रिक महाविद्यालय अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत तिसऱ्या दिवशी एक स्पर्धा विक्रम नोंदविला गेला आहे. तिहेरी उडीत विवेकानंद तांत्रिक महाविद्यालय, पुत्तूरच्या पवित्रा जी. ने तिचा स्वत: चाच विक्रम मागे टाकित नवीन स्पर्धा विक्रम नोंदविला आहे. तर विवेकानंद महाविद्यालय, पुत्तूर 80 पदकांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. व्हीटीयूच्या क्रीडा मैदानावर सुरु असलेल्या 24 व्या व्हीटीयू अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसऱ्या दिवशी तिहेरी उडीत विवेकानंद तांत्रिक महाविद्याल, पुत्तूरच्या पवित्रा जी. ने तिचा गतवर्षीचा 12.11 मी. चा विक्रम मोडीत काढीत या स्पर्धेत 12.58 मी. ची तिहेरी उडी घेत नवीन स्पर्धा विक्रम नोंदविला गेला आहे.

स्पर्धेचा सविस्त निकाल पुढील प्रमाणे,
- पुरुष विभाग – 110 मी. अडथळा शर्यत : 1) हर्ष एस. एम. (सिद्धगंगा तांत्रिक महाविद्यालय, तुमकूर) 2) आदर्श (एनएएएम तांत्रिक महाविद्यालय, निट्टे) 3) वाघेश एन. पी. (एटीएमपी तांत्रिक महाविद्यालय, म्हैसूर).
- 4×100 मी. रिले : 1) विवेकानंद तांत्रिक महाविद्यालय, निट्टे 2) आरएलएस तांत्रिक महाविद्यालय, बेंगळूर 3) एमएएएम तांत्रिक महाविद्यालय, निट्टे.
- 5 हजार मी. धावणे : 1) रंगनाथ सी. (सरकारी तांत्रिक महाविद्यालय, रामनगरा) 2) तिशान ए. एम. (केव्हीजी तांत्रिक महाविद्यालय, कुरुंजीबाघ (मंगळूर)) 3) प्रशांत एस. बी. (गर्व्हनमेंट तांत्रिक महाविद्यालय, कुशलनगर).
- थाळीफेक : 1) संपत हेगडे (सह्याद्री तांत्रिक महाविद्यालय, मंगळूर) 2) चिरायूश (कॅनरा तांत्रिक महाविद्यालय, मंगळूर) 3) संदीप एच. (राजीव तांत्रिक महाविद्यालय, हासन).
- तिहेरी उडी : 1) जीवन एन. एम. (ज्योती तांत्रिक महाविद्यालय, बेंगळूर) 2) वाघेश एन. पी. (एटीएमई तांत्रिक महाविद्यालय, म्हैसूर) 3) अंजानियम (एनएएएम तांत्रिक महाविद्यालय, निट्टे).
- महिला विभाग – 4×100 मी. रिले : 1) विवेकानंद तांत्रिक महाविद्यालय, पुट्टूर 2) आरव्ही तांत्रिक महाविद्यालय, बेंगळूर) 3) सेंट जोसेफ तांत्रिक महाविद्यालय, मंगळूर).
- 5 हजार मी. धावणे : 1) रक्षीता आय. (विवेकानंद तांत्रिक महाविद्यालय, पुट्टूर) 2) चेंदम्मा के. टी. (कूर्ग तांत्रिक महाविद्यालय, कूर्ग) 3) सीमा एस. तेंडुलकर (आरव्ही तांत्रिक महाविद्यालय, बेंगळूर).
- गोळाफेक : 1) रिकथा किरण (श्रीनिवास तांत्रिक महाविद्यालय, मंगळूर) 2) श्री नविथा टी. (यूबीडीटी तांत्रिक महाविद्यालय, दावणगिरी) 3) वीनेला कोठारी (एमएस रामाय्या तांत्रिक महाविद्यालय, बेंगळूर).
- तिहेरी उडी : 1) पवित्रा जी. (विवेकानंद तांत्रिक महाविद्यालय, पुट्टूर) 2) मेधा एस. (एनएएएम तांत्रिक महाविद्यालय, निट्टे) 3) लावण्या ए. पी. (नवकीस तांत्रिक महाविद्यालय, हासन).
- महिला हॅपथलॉन स्पर्धा : 1) जयश्री बी. 2206 गुण (विवेकानंद तांत्रिक महाविद्यालय, पुट्टूर) 2) ध्रुवा एम. 1720 गुण (एएमसी तांत्रिक महाविद्यालय, बेंगळूर) 3) अनघा एम. ए. 1269 गुण (राष्ट्रीय तांत्रिक महाविद्यालय, म्हैसूर). यांनी विजय संपादन केले.
तिसऱ्या दिवसा अखेर विवेकानंद तांत्रिक महाविद्यालयाच्या पुरुष गटाने 16 तर महिला गटाने 64 अशी एकूण 80 पदकांसह पहिल्या क्रमांकावर, एनएएएम तांत्रिक महाविद्यालयाच्या पुरुष गटाने 20 तर महिला गटाने 7 अशी एकूण 27 पदकांसह दुसरा क्रमांक, सह्याद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या पुरुष गटाने 5 तर महिला गटान 11 अशी एकूण 16 पदकांसह तिसऱ्या क्रमांक, श्रीनिवास तांत्रिक महाविद्यालयाच्या पुरुष गटाने 5 तर महिला गटाते 10 अशी एकूण 15 पदकांसह चौथा क्रमांक तर एसडीएम तांत्रिक महाविद्यालयाच्या महिला गटाने 13 पदकांसह पाचवा क्रमांक, सरकारी तांत्रिक महाविद्यालच्या पुरुष गटाने 10 पदकांसह सहावा क्रमांक पटकाविला आहे. बुधवारी स्पर्धेचा शेवटचा दिवस असून दुपारी 3 वाजता बक्षीस वितरण होणार आहे. बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या व व्हीटीयूचे उपकुलगुरु प्रा. विद्याशंकर एस., व्हीटीयूचे स्पर्धा सचिव डॉ. पी. पुट्टस्वामीगौडा, फायनान्स अधिकारी एम. ए. सपना, रजिस्टर टी. एन. श्रीनिवास व बी. रंगास्वामी यांच्या उपस्थितीत होणार आहे, असे स्पर्धा सचिव डॉ. मधुकर देसाई यांनी कळविले आहे.









