वृत्तसंस्था/ दरबान
येथे सुरू असलेल्या विश्व टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राने एकेरीत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.
जागतिक महिला टेबल टेनिसपटूंच्या मानांकन यादीत 39 व्या स्थानावरील मनिका बात्राने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात सिंगापूरच्या वाँग रु हिचा 11-9, 14-12, 11-4, 11-8 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले. मात्र या स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या शरथ कमल आणि जी. साथीयान यांचे आव्हान समाप्त झाले आहे. जर्मनीच्या डेंग क्यू याने साथीयानचा 11-6, 11-6, 11-5, 11-7 असा पराभव केला. आता मनिका बात्रा आणि जी. साथीयान ही जोडी मिश्र दुहेरीत खेळणार आहे. तर शरथ कमल आणि साथीयान ही जोडी बुधवारी पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात खेळणार आहे.









