वृत्तसंस्था/ अल्माटी
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक स्कीट नेमबाजी स्पर्धेत भारताचे नेमबाज गनेमत सेखॉने रौप्यपदक तर दर्शना राठोडने कास्यपदक मिळवून नवा इतिहास घडविला.
महिलांच्या विश्वचषक स्कीट नेमबाजीत पहिल्यांदाच भारतीय स्पर्धकांनी ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कझाकस्तानच्या अॅसेम ओरीनबेने महिलांच्या स्कीट नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले. या क्रीडा प्रकारात भारताच्या गनेमत सेखॉ आणि ओरीनबे याने अंतिम 60 शॉटमध्ये प्रत्येकी समान 60 शॉट नोंदवले. पण त्यानंतर अंतिम दोन शॉटमध्ये गनेमतने एक शॉट अचूक नोंदवू शकले नाही तर ओरीनबेने दोन्ही शॉट अचूक नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताच्या गनेमत सेखॉचे विश्वचषक स्कीट नेमबाजीतील वैयक्तिक गटातील हे दुसरे पदक आहे. मात्र अल्मेटीच्या स्पर्धेत वरिष्ठ गटात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या भारताच्या दर्शना राठोडने कास्यपदक मिळवले. कझाकस्तानमधील सुरु असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिलांच्या स्कीट नेमबाजीत भारताच्या दर्शना राठोडने अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या सहा स्पर्धकांमध्ये दुसरे स्थान मिळवले. तसेच तिने 120 शॉट नोंदवत राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी साधली होती तर भारताची गनेमत सेखॉने अंतिम फेरीसाठीच्या पात्र फेरीमध्ये 117 शॉट नोंदवत चौथे स्थान तर ओरीनबेने 121 शॉट नोंदवत आघाडीचे स्थान









