ओडिशा दुसऱ्या स्थानावर
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जलसंरक्षण, व्यवस्थापन आणि पाण्याच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्याप्रकरणी मध्यप्रदेशने सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळविला आहे. याप्रकरणी ओडिशा दुसऱ्या तर आंध्रप्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे. जलसंरक्षणाप्रकरणी सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून ओडिशातील गंजमची निवड झाली आहे. याप्रकरणी तमिळनाडूचे नमक्कल दुसऱ्या तर तेलंगणातील आदिलाबाद जिल्हा तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. जलसंरक्षणाच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणारी ग्रामपंचायत म्हणून तेलंगणातील जगन्नाथपुरम गावाची निवड झाली आहे. तर तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यातील कदावुर ग्रामपंचायत तर केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील मणिकल ग्रामपंचायतीला संयुक्तपणे दुसरे स्थान मिळाले आहे. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील कडेगाव हे याप्रकरणी तिसऱ्या स्थानावर राहिले आहे.
सर्वोत्तम शहरी पालिकांच्या श्रेणीत चंदीगड महापालिकेने बाजी मारली आहे. दुसऱ्या स्थानावर इंदोर महापालिका राहिली. तर तिसऱ्या स्थानावर सूरत अन् महाराष्ट्रातील मलकापूर नगरपरिषद राहिली आहे.









