अमृतसर
बीएसएफने सोमवारी रात्री उशिरा पंजाबच्या अमृतसरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीक अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका पाकिस्तानी ड्रोनला पाडविले आहे. या ड्रोनजवळून 2 पाकिटे हस्तगत करण्यात आल्याची माहिती बीएसएफ कमांडेंट अजय कुमार मिश्रा यांनी दिली आहे. बीओपी राजाताल भागात एका मोहिमेच्या अंतर्गत बीएसएफच्या 144 कोरच्या जवानांनी ही कारवाई केली आहे.









