अमित साध मुख्य भूमिकेत
अमित साधने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ‘काई पो चे’, ‘सुल्तान’ या चित्रपटांमधील अभिनयाद्वारे अमित साधने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अमित साध आता ‘घुसपैठ’ या लघुपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दानिश सिद्दीकी या फोटोजर्नलिस्टवर आधारित हा लघुपट आहे. कोरोना महामारीदरम्यान दानिशने काढलेल्या छायाचित्रांनी लोकांना भावुक करून सोडले हेते. जुलै 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जानंतर एका चकमकीत गोळी लागल्याने दानिश यांचा मृत्यू झाला होता.

अमित साधच्या या लघुपटाचे स्क्रीनिंग ‘बोस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023’मध्ये देखील झाले होते. ‘घुसपैठ’सोबत अमित साध आणखी अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. यात ‘मैं’, ‘पुणे हायवे’, ‘दुरंगा 2’ समवेत अनेक चित्रपट आहेत. यातील काही प्रोजेक्ट्स चालू वर्षी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.
अमित साधने आतापर्यंत ‘यारा’, ‘रनिंग शादी’, ‘गु•ा रंगीला’, ‘सरकार 3’, ‘शंकुतला देवी’, ‘ऑपरेशन परिंदे’, ‘गोल्ड’ आणि ‘बारिश और चाउमीन’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.









