शिवसेनेचे (Shivsena) जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी हिंदुजा रुग्णालयामध्ये (Hindu Hospital) दाखल केले आहे. मेंदूशी संबंधीत एका आजारावर मनोहर जोशींवर गेले काही दिवस घरीच उपचार सुरू होते. पण अचानक त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीची बातमी कळताच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयामध्य़े धाव घेतली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचा शिवसेनेच्या उभारणीत एक महत्वाचा वाटा आहे. मनोहर जोशी हे शिवसेना पक्षाच्य़ा सुवर्णकाळात मुख्यमंत्रीपद भुषवलेले नेते असून जुन्या फळीतील एक महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. पण गेल्या काही वर्षापासून तब्येतीच्या कारणामुळे सक्रिय राजकारणापासून दूर होते. हि बातमी कळताच ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह हिंदुजा रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टरांशी चर्चा केली.
मनोहर जोशी गेले काही दिवसापासून मेंदूच्या आजारासंबंधित व्याधीचा त्रास होता. पण आज त्यांची तब्येत अधिक बिघडल्यामुळे त्यांना तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हिंदुजा रुग्णालयताली डॉक्टरांकडून कळवण्यात आले आहे.