सावंतवाडी / प्रतिनिधी
बबन साळगावकरांनी घेतली सावंतवाडी वाहतूक नियंत्रकांची भेट
दोडामार्ग तालुक्यातील मांगेली हे गाव अति दुर्गम गाव म्हणून ओळखलं जातं. या गावाला कर्नाटक बॉर्डर लागते. वाहतुकीचे साधन म्हणजेच एकमेव असलेली एसटी फेरी अलीकडच्या काळामध्ये अनियमित आहे त्यामुळे येथील महिलांना,कष्टकरी जनतेला, गरीब नागरिकांना प्रचंड हालअपेक्षा आणि मानसिक तणावांमध्ये जीवन जगावं लागत आहे. या अनुषंगाने आज एसटीचे वाहतूक नियंत्रक पवार यांची भेट सावंतवाडी डेपो मॅनेजर कार्यालयामध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी घेतली . मांगेली हे माझं गाव असून या गावावरती झालेला अन्याय सहन केला जाणार नाही असा सक्त इशारा साळगावकरांनी दिला . फायद्या तोट्याचा हिशोब न बघता सामान्य जनतेची दळणवळणाचे साधन असलेल्या एसटी फेऱ्या कायम चालू ठेवा. मांगेली हे अति दुर्गम गाव आहे इथल्या जनतेवरती अन्याय करू नका. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे एसटीचे ब्रीद वाक्य आहे त्या वाक्याला जागा आणि गावाची एसटी फेऱ्या चालू ठेवा. अशी मागणी करण्यात आली . यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर तसेच दोडामार्ग तालुक्याचे रहिवासी अभिमन्यू लोंढे माजी नगरसेवक सुरेश भोगटे, यांनीही तिखट शब्दात एसटी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.