Jayant Patil Full PC : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल ईडीने 9 तास चौकशी केली. ईडीच्या या कारवाईनंतर राज्यभरात कार्यकर्ते संतप्त झाले. तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ईडीची चौकशी पूर्ण झाल्यावर ईडी कार्यालयात काय काय घडलं? हे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर सांगितलं.यावेळी मी काही केले नाही तर मला घाबरायचे काही कारण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तर मी दिली आहेत. ईडीकडे आता कुठलेही प्रश्न शिल्लक राहिले नाहीत. ते बोलवतील तेव्हा मी पुन्हा जाईन. मी सुरुवातीलाच बोललो होतो मी चौकशीला समोर जाणार.जेव्हापासून मला ईडीचा समन्स आला तेव्हापासून राज्यभरातून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि मित्रांचे फोन येत आहेत.मी त्यांचेही आभार मानतो.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मला ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं चांगली वागणूक दिली, त्यामुळे त्यांच्याविषयी कोणताही तक्रार करायची गरज नाही. मी पुन्हा सांगतो पूर्ण आयुष्यात आय़एलएफएसशी माझा कुठलाही संबंध आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल. चौकशीसाठी 9 तासांचा अवधी लागतो का असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारताच ते म्हणाले की, पूर्ण दिवस प्रत्येक प्रश्नाची लिखीत स्वरूपात टाईप केलं जातं. पूर्ण दिवस लेखी जबाब घेतले जातात. ही प्रोसेजर चालते. त्या काळात ‘शिवकालीन महाराष्ट्र’ हे पुस्तक माझं अर्ध वाचून झालं. त्यांनी जे प्रश्न विचारले त्याला मी उत्तर दिलं आहे, असेही ते म्हणाले. सकाळपासून कार्यकर्ते, नेते, जितेंद्र आव्हाड, पत्रकार यांचे आभार मानतो.
जयंत पाटील ईडी कार्यालयात गेल्यानंतर अनेक नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मात्र अजित पवार काहीचं बोलले नाहीत याविषयी काय सांगाल अस जयंत पाटील यांना विचारण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, प्रमुख नेत्यांची स्वत:ची काम असतात. ते पक्षकार्यात गुंतलेले असतात. सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांना माहित आहे जयंत पाटील स्वच्छ आहे. चौकशीनंतर बाहेर येणार,त्यामुळे सगळ्यांनीच मुंबईत यावं याची काही आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले.
Previous Articleकोलगाव- चव्हाणवाडी अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन !
Next Article काडापूर येथे वादळी पावसाने मोठे नुकसान








