वृत्तसंस्था/ रोम
रविवारी येथे झालेल्या इटालियन खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या तृतीय मानांकित डॅनिल मेदव्हेदेवने एकेरीचे जेतेपद पटकाविताना डेन्मार्कच्या होल्गेर रुनेचा पराभव केला.
या अंतिम सामन्यात तृतीय मानांकित मेदव्हेदेवने रुनेवर 7-5, 7-5 अशी मात केली. पावसामुळे हा अंतिम सामना उशिरा खेळविला गेला. 2004 नंतर पहिल्यांदाच मेदव्हेदेवने या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यत मजल मारली होती. आता या स्पर्धेनंतर मेदव्हेदेव 28 मेपासून सुरु होणाऱ्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. मेदव्हेदेवने आपल्या वैयक्ति टेनिस कारकिर्दीत पहिल्यांदाच क्लेकोर्टवरील स्पर्धा जिंकली आहे.









