शिरोळ प्रतिनिधी
पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर राहत असलेल्या फिर्यादी कपिल अनिल गवळी यांच्या मालकीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस ही मोटारसायकलवर अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. तसेच शिरोळमध्ये संभाजीनगर येथील एकाची मोटर सायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने शहरात खळबळ माजली आहे. दुचाकी गाड्या व मोबाईलचे चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
याबाबतची माहिती अशी की फिर्यादी कपिल गवळी हे पोलीस स्टेशन समोर राहत आहेत. त्यांच्या घरासमोर लावण्यात आलेली स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची दुचाकी गाडी 18 मे रोजी रात्री अकरा ते पहाटेचा पाच वाचण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याची फिर्याद दिली आहे. सदर गाडीची अंदाजे 30 हजार रुपये किंमत असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार नाईक हे करीत आहेत. शिरोळ शहरात गेल्या आठ दिवसापासून अनेक दुचाकी गाड्या अज्ञात चोट्याने लंपास केले आहेत तर शनिवारी आठवड्याच्या बाजार मध्ये अनेकांचे मोबाईल व पैशाचे पाकीट लंपास केल्याने नागरिकात भीतीचे वातावरणात निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवाशीयातून केली जात आहे,,









