ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केरळच्या कन्नूर जिल्ह्यात एका पोत्यात 8 उच्च क्षमतेचे बॉम्ब आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने हे बॉम्ब निकामी करत मोठय़ा हल्ल्याचा कट उधळून लावला. कन्नवम पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
पोलीस उपनिरीक्षक सतीशन व्ही. यांनी दिलेल्या माहितीनुसार, किझ्झाकल परिसरात एका पाण्याच्या पाईपमध्ये पोत्यात उच्च उद्ध्वस्त क्षमता असलेले देशी बनावटीचे 8 बॉम्ब ठेवण्यात आले होते. स्थानिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन हे बॉम्ब निकामी केले. याप्रकरणी अज्ञातांवर कन्नवम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









