संगमेश्वर, प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे एम. के. म्हात्रे कंपनीच्या डंपरने पेट घेतल्याने येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
निझाम अन्सारी हा रिकामी डंपर घेऊन वांद्री येथे जात होता. मात्र आंबेड बुद्रुक येथे आला असता डंपरने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक अर्धा तास थांबवण्यात आली होती. त्यानंतर यानंतर पाण्याचा बंब मागविण्यात आला.महामार्गावर काम करणारे डंपर आणि टँकरने आग विझवण्यात आली.तसेच रस्त्यावरील वाहतूक एका बाजूने सुरळीत करण्यात आली आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









