युवराज भित्तम, म्हासुर्ली वार्ताहर
रायगड जिल्ह्यातील रोहा येथील ध्येयवेडा दुर्गरोहक सुबोध गांगुर्डे हा तरुण सायकल वरून प्रवास करत ३६५ दिवसात महाराष्ट्रातील सर्व लहान मोठे ३७० गडकिल्ले सर करणार आहे. तेथील माती जमा करून त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती तयार करून ती पृथ्वीवरील सर्वात उंच अशा एव्हरेस्ट शिखरावर घेऊन जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ल्यावर जाऊन माती जमा करण्यासाठी सध्या त्याचा सायकल प्रवास सुरु आहे.आतापर्यंत १७२ दिवसात साडेनऊ हजार किमीचा प्रवास करत २०० किल्यावरील माती गोळा केली आहे. त्यांच्या सायकल मोहिमेला जिल्ह्यातील शिवप्रेमींच्याकडून प्रेम व सर्व प्रकारची मदत मिळत असल्याचे त्यांनी दै.तरुण भारत संवाद’शी बोलताना सांगितले.
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी पासून सुबोध गांगुर्डे याने सायकल वरून आपल्या प्रवासाला सुरुवात केली . आतापर्यंत अर्ध्या महाराष्ट्रातील विविध भागातील गड किल्ले भ्रमण करत तो कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचला आहे.यावेळी त्याची शिवभक्त, शिक्षक नेते युवराज पाटील व इतर सहकाऱ्यांनी भेट घेत मदत करत त्याच्या या दुर्ग प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
सुबोध गांगुर्डे यांनी सांगितले की, माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे माझे स्वप्न होते.परंतु ते करण्याआधी महाराष्ट्रातील मराठी मातीच्या छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांची सफर करून त्या किल्ल्यांची आजची अवस्था,प्रत्यक्ष फोटो व व्हिडिओच्या रूपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तसेच त्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती व्हावी हा उद्देश घेऊन ३६५ दिवसात ३७० किल्ले पूर्ण करून रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन माउंट एव्हरेस्टवर भगवा फडकवावा असा मानस असल्याचे स्पष्ट केले.
सुबोध यांच्या दुर्ग भेट प्रवासातील
१७२ दिवसाचा टप्पा पूर्ण झाला असून कोल्हापूर नंतर सांगली,सातारा,पुणे जिल्हे करून तो विदर्भातील गडकोट किल्ल्यांना भेटी देऊन माती गोळा करणार असल्याचे त्यांने तरुण भारत संवाद’शी बोलताना सांगितले. त्याच्या या दृढ निश्चयाला आणि प्रचंड मेहनतीचे महाराष्ट्रातील दुर्गप्रेमी, इतिहास प्रेमी आणि सामाजिक संघटनांच्या वतीने कौतुक केले जात असून, ठिकठिकाणी त्याचे स्वागत केले जात आहे.तसेच सुबोध सांगतो की छत्रपती शिवरायाचे दैदिप्यमान विचार व पराक्रमी कर्तुत्व महाराष्ट्रातील आजच्या नवीन तरुण पिढीपर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्याने सांगितले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









