वायुदलाचा महत्त्वाचा निर्णय : वारंवार होणाऱ्या दुर्घटनांची पार्श्वभूमी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उ•ाणादरम्यान वारंवार दुर्घटनाग्रस्त होणाऱ्या मिग-21 लढाऊ विमानांच्या पूर्ण ताफ्याच्या उड्डाणाला स्थगिती दिली आहे. अलिकडेच राजस्थानात मिग-21 लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने 3 महिलांना जीव गमवावा लागला होता. उड्डाणाला देण्यात आलेली स्थगिती ही तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचे समजते.
भारतीय वायुदलोन मिग-21 विमानांच्या ताफ्याच्या उड्डाणाला रोखण्याचा निर्णय राजस्थानात दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. या विमान दुर्घटनेची चौकशी सध्या सुरू आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत विमानाच्या तिन्ही स्क्वाड्रन उड्डाण करणार नाहीत असे वायुदलाकडून सांगण्यात आले. मिग व्हेरियंटच्या पहिल्या ताफ्याला 1963 मध्ये भारतीय वायुदलात सामील करण्यात आले होते आणि भारताने पुढील काही दशकांमध्ये 700 हून अधिक मिग-व्हेरियंटची विमाने खरेदी केली होती. वायुदलातील स्वत:च्या जुन्या लढाऊ विमानांच्या ताफ्याला बदलण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये 83 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडसोबत 48 हजार कोटी रुपयांचा करार केला होता.
मिग-21 मुळे शेकडो दुर्घटना
भारतीय वायुदल 114 बहुउद्देशीय लढाऊ विमान खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे. 1960 च्या दशकाच्या प्रारंभी वायुदलात सामील करण्यात आल्यावर आतार्पंत मिग-21 विमानांच्या 400 दुर्घटना घडल्या आहेत.
टप्पाबद्ध पद्धतीने मिग-21 ला हटविणार
भारतीय वायुदलात सध्या मिग-21 च्या तीन स्क्वाड्रन कार्यरत आहेत. या सर्व स्क्वाड्रन्सला 2025 च्या प्रारंभी टप्पाबद्ध पद्धतीने हटविण्यात येणार आहे. राजस्थानात दुर्घटनाग्रस्त झालेले लढाऊ विमान एका नियमित प्रशिक्षण उड्डाणावर असताना कोसळले होते. या दुर्घटनेत वैमानिक किरकोळ जखमी झाला होता.
मिग-21 संबंधित मागील दोन वर्षांमधील दुर्घटना
5 जानेवारी 2021 : राजस्थानच्या सूरतगढनजीक मिग-21 कोसळले.
17 मार्च 2021 : कॉम्बॅट ट्रेनिंगदरम्यान ग्वाल्हेरनजीक मिग-21 कोसळले, ग्रूप कॅप्टन हुतात्मा.
21 मे 2021 : पंजाबच्या मोगा जिल्ह्यात मिग-21 कोसळले, वैमानिक हुतात्मा.
25 ऑगस्ट 2021 : राजस्थानच्या बाडमेरनजीक विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित.
24 डिसेंबर 2021 : जैसलमेरमध्ये मिग-21 विमान दुर्घटनाग्रस्त, वैमानिक हुतात्मा.
28 जुलै 2022 : बाडमेरमध्ये मिग-21 विमान कोसळले, दोन वैमानिक हुतात्मा
वायुदलाकडे लढाऊ विमानांची कमतरता
भारतीय वायुदल विमानांच्या कमतरतेला सामोरे जात आहे. चीन आणि पाकिस्तानशी मुकाबला करण्यासाठी वायुदलाला 42 स्क्वाड्रन्सची गरज आहे. परंतु सध्या सुमारे 32 स्क्वाड्रन्स उपलब्ध आहेत. मागील वर्षी संरक्षण विषयक संसदीय समितीचा अहवाल प्राप्त झाल होता. या अहवालात 42 स्क्वाड्रन्सची गरज असल्याचे असल्याचे नमूद होते. आगामी वर्षांमध्ये जुनी विमाने कालबाह्या ठरल्याने उपलब्ध स्क्वाड्रन्सची संख्या आणखी कमी होणार असल्याने अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली होती. सद्यकाळात भारतीय वायुदलाकडे मिग-21 च्या तीन स्क्वाड्रन्स आहेत. एका स्क्वाड्रनमध्ये 16-18 विमाने असतात. वायुदलाकडे सध्या 50 मिग-21 विमाने आहेत. वायुदलात तीन वर्षांमध्ये मिग-21 च्या स्क्वाड्रन्सा निरोप देण्यात येणार आहे. सद्यकाळात 42 ऐवजी 32 स्क्वाड्रन्स वायुदलाकडे आहेत. म्हणजेच सुमारे 160-18 विमानांची कमतरता आहे. अशा स्थितीत मिग-21 स्क्वाड्रन्सना हटविण्यात आल्यास आणखी 50 विमानांची कमतरता भासणार आहे.
उडती शवपेटी
मिग-21 चे सेफ्टी रिकॉर्ड अत्यंत खराब आहे, यामुळे भारतीय वायुदल त्याला अन्य सक्षम विमाने म्हणजेच एसयू-30 आणि स्वदेशी तेजस विमानाद्वारे बदलत आहे. यात विलंब होत असल्यानेच वायुदलात मिग-21 अद्याप स्वत:चे स्थान राखून आहे. 1963 नंतर वायुदलाला विविध श्रेणींची 872 मिग लढाऊ विमाने मिळाली आहेत. यातील सुमारे 500 लढाऊ विमाने दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. या दुर्घटनांमुळे 200 हून अधिक वैमानिक आणि 56 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. याचमुळे मिग-21 हे विमान उडती शवपेटी आणि विडो मेकर या नावाने बदनाम आहे.









