उन्हाळ्यात खूप घाम येतो. सहाजिकच केसातही घाम येतो आणि त्यामुळे त्यातून दुर्गंधी येते. पण घरगुती उपाय करता येतात.आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जे तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळवून देऊ शकतात. चला या उपायांबद्दल जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात केसांना येणारा घामाचा वास दूर करण्यासाठी लिंबू खूप उपयुक्त ठरू शकते. अशा स्थितीत एका भांड्यात लिंबाचा रस मिसळा आणि हे पाणी शॅम्पूने केस धुतल्यानंतर केसांना घाला. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा. घामाच्या वासापासून आराम मिळतो आणि केसांनाही चमकदार बनवता येते.
कोरफडही केसांसाठी खूप उपयुक्त असते. केसांना येणारा घामाचा वास दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. अशावेळी केसांना आणि मुळांना कोरफडीचे जेल लावा आणि २० ते २५ मिनिटांनी केस धुवा. असे केल्याने केस मऊ आणि चमकदार तर होतीलच शिवाय घामाचा वासही दूर होतो.
केसांतून येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी गुलाबपाणी उपयुक्त आहे. हे तुमच्या केसांचा चिकटपणा दूर करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. अशावेळी एका भांड्यात गुलाबपाणी टाकून केसांची मूळ त्यामध्ये बुडवा. असे केल्याने केसांमधून तेल निघून जाते आणि केसांना छान वास येऊ लागतो.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









