वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक ए इन्साफ या पक्षाचे नेते इम्रान खान यांच्या जामीनावरचा निर्णय लाहोर उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. मंगळवारच्या सुनावणीनंतर निर्णय राखून ठेवण्यात आला. इम्रान खान यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे प्रलंबीत आहेत. त्या सर्वांवर त्यांनी जामीन देण्याची मागणी लाहोर उच्च न्यायालयात केलेली आहे.
इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अस्थायी जामीन संमत केला होता. लाहोर उच्च न्यायालयात त्यांनी सादर केलेल्या जामीन अर्जाला तेथील सरकारने विरोध केला आहे. इम्रान खान यांच्यावर गंभीर गुन्हे असल्याने त्यांना जामीन देणे धोक्याचे ठरेल. जामीनावर बाहेर आल्यास ते पुरावे नष्ट करु शकतात किंवा साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला.









