Cabinet Meeting : सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने जाहीर केली आहे. यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनीही घोषणा जाहीर केल्या.
मंत्रिमंडळ बैठकितील निर्णय
-आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार २५ हजार रुपये मानधन.
-अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता.
-इलेट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ.
-मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण.
-आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये करण्यात आलेले असून पूर्वीच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आलीय.
कौशल्य,रोजगार आणि उद्योजकता विभागासाठी हा निर्णय घेण्यात आला.
-उद्योग विभागाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक्स अवकाश व संरक्षण रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित विषयांची नवीन धोरणे तयार होईपर्यंत या धोरणांना मुदतवाढ असेल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








