Sanjay Raut News : देशात लिहणाऱ्यावर ,बोलणाऱ्यावर, वक्तव्यावर बंधन घातली जात आहेत. याच बरोबर वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या यांच्यावरही दबाव आणला जात आहे. या हुकुमशाही विरोधात आमचा लढा आहे. आम्ही जी लढाई करत आहोत ती त्याचसाठी आहे. बेकायदेशीर सरकारचा आदेश पाळण हा अपराध आहे.माझ्यावर गुन्हा दाखल केला. याचा अर्थ सरकार विरोधात काही बोलायचं नाही अशी भूमिका घेतली आहे. पोलिसांचा वापर केला जातोय. चुकीचे आदेश पाळण हे बेकायदेशीर आहे.भविष्यात तुम्ही सरकार बदलल्यावर अडचणीत याल अस मी बोललो. अशी वक्तव्य गेल्या 50 वर्षात अनेकदा झाली आहेत. मग आताच का गुन्हा नोंदवला जातोय असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत य़ांनी माध्यमांशी बोलताना केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलं आहे.पोपट मेलेलाच आहे, फक्त विधानसभा अध्यक्षांनी जाहिर करायचं आहे. दुसरं अस या सरकारमध्ये फडणवीस अतिशय हुशार आणि अभ्यासू आहेत अस माझ मत आहे. मात्र ते आता अ का बोलत आहेत हे समजत नाही. देवेंद्र फडणवीस यांना राजकारण, प्रशासन कळतं. कायद्याचा चांगला अभ्यास आहे. पडद्यामागे काय चालू आहे हे समजत. ते सर्वांच्या संपर्कात असतात. मात्र तरीही ते अशी वक्तव्य करतात म्हणजे त्यांची काहीतरी मजबूरी आहे, असेही ते म्हणाले.
आमदारांच्या अपात्रेचा निर्णय कायद्यानुसार आणि संविधानातील तरतुदीनुसार घेतला जाईल. मागण्या सगळेच करत असतात. मात्र निर्णय हा कायद्यानुसार व संपूर्ण चौकशी अंती घेतला जाईल.मी घाई करणार नाही,असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. या संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, अनेक पक्षांतर केलेले नार्वेकर बोलतात की विधानसभा अध्यक्ष बोलतात ते त्यांनी स्पष्ट करावं. पक्षांतर हा त्यांचा आवडता छंद आहे. पण सध्या ते विधानसभा अध्यक्षांच्या खूर्चीवर बसले आहेत.त्यांच्या स्पष्टीकरणानंतर उत्तर देऊ. ते कायद्याचे जाणकार आहेत. ते अनेक वर्षे शिवसेनेचे वकिल होते. सेनेच्या माध्यमातून त्यांच राजकारण पुढं गेलयं. त्यांना माहितीयं शिवसेना काय आहे ते.काय घडलय आणि कसं घडवलय हे त्यांना माहित आहे.त्यांना जर विरोधनाच्या बाजूने उभ राहायचं असेल तर कायद्याची पदवी गुंडाळून पेटीत बंद करून ठेवावी असा टोलाही लगावला.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








