कागल / प्रतिनिधी
Kolhapur Crime News : बानगे (ता. कागल) येथील मेंढपाळ मारुती मायाप्पा धनगर (वय 28) यांचा त्यांच्याकडेच बकरी व्यवस्थापनासाठी असणाऱ्या दोघा कामगारांकडून गज आणि कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. पगार वेळेत न दिल्याने हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संदीप दादासो माळी (वय 36, रा. नांदणी, ता. शिरोळ) व रविकिरण चैनय्या (वय 24, रा. बेळगाव) या दोघांना कागल पोलिसांनी अटक केली आहे.
मारुती धनगर यांच्या मेंढ्या बानगे गावच्या पश्चिमेला असणाऱ्या भटकी नावाच्या शेतात बसायला होत्या. माळी व चैनय्या हे अनेक दिवसांपासून धनगर यांच्याकडे काम करत होते. मात्र अनेक दिवसांपासून पगारच न दिल्याच्या रागातून या दोघांनी शुक्रवारी रात्री मारुती धनगर झोपेत असताना त्यांच्यावर लोखंडी गज व कुऱ्हाडीने जोरदार वार केले. त्यानंतर त्यांनी शेजारच्या उसात त्यांचा मृतदेह टाकला होता. हे दोघेही दिवसभर दारुच्या नशेत होते.
दरम्यान, मारुती धनगर यांच्या पत्नी बाळंतपणामुळे घरीच असतात. शनिवारी मारुती धनगर हे घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. यावेळी या दोघा कामगारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शनिवारी सायंकाळी त्यांचे चुलत बंधू सिद्धू रामा धनगर यांना त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, कागलचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके, विजय पाटील यांनी धाव घेऊन रात्री उशिरा पंचनामा केला. तपास मोनिका खडके करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









