Gokul Dudh गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदासाठी अरुण डोंगळे यांची निवड झाली आहे. विद्यमान चेअरमन विश्वास पाटील १७ मे रोजी राजीनामा दिल्यानंतर अरूण डोंगळे गोकुळ दुधसंघाच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारतील. यापुर्वी आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत डोंगळे यांच्या नावावर एकमत झाले होते.
विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांना गोकुळच्या अध्यक्षपदाची पहिल्या दोन वर्षाची टर्म दिली होती. ती येत्या 17 तारखेला संपत आहे. त्यामुळे नविन अध्यक्षपदासाठी अरूण डोंगळे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. अरूण डोंगळे हे गोकुळचे जेष्ठ संचालक असून गेली अनेक वर्षे त्यांनी गोकुळच्या संचालक मंडळावर काम केले आहे.









