सांगरूळ प्रतिनिधी
सांगरूळ ( ता . करवीर ) येथील जवान विनायक दत्तात्रय सणगर ( वय ४० ) यांचे चंदीगड येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. विनायक सणगर हे सन २००१ साली भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते .सध्या ते चंदीगड येथे हवालदार पदावर कार्यरत होते. ते सुट्टीवर गावी आले होते. सुट्टी संपल्यानंतर बुधवारी १० मे रोजी चंदीगड येथे कर्तव्य बजावण्यासाठी गेले होते .तेथे त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी शुक्रवार १२ रोजी सायंकाळच्या सुमारास जवान विनायक सणगर यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची माहिती विनायक यांचा भाचा प्रदीप ढोबळे याला दूरध्वनीवरून दिली.
आज शनिवारी १३ मे रोजी विमानाव्दारे पार्थिवदेह चंदीगड येथून १२.३० पर्यत पूणे येथे येईल. तेथून रविवार १४ मे रोजी कोल्हापूरला सकाळी ६ पर्यंत व तेथून सकाळी ७ पर्यंत मुळ गावी सांगरूळ येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडणार आहे. अशी माहिती विनायक सनगर यांच्या नातेवाईकांच्याकडून दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









