दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रसने आघाडी घेत भाजपला धोबीपछाड केले आहे. आज सकाळी 8 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून कल काँग्रेसकडेच राहीला. दुपारी 1 वाजेपर्यंत काँग्रेसने 130 जागांवर आघाडी मिळवली. दक्षिण भारतात सत्ता असलेलं एकमेव राज्य भाजपनं गमावलं आहे. कर्नाटकात विजयाच्या वाटलाचीचा आनंदोत्सव सकाळपासूनच काँग्रेस कार्यकर्ते साजरा करत आहेत. दरम्यान, भाजप पराभवाकडे वाटचाल करत असतानाच भाजपचे नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.खूप मेहनत घेऊन देखील आम्ही छाप पाडू शकलो नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
एकंदरीत भाजपने केलेला कर्नाटकातील प्रचार आणि माध्यमांनी केलेला सर्व्हे पाहता त्रिशंकू सरकारमध्ये चढाओढ असणार अस समोर आलं होत. मात्र निकालाच्या आकडेवारीवरून जनतेनं काँग्रेसला कौल दिला.तर भाजपचा सुपडा साफ केला. भाजपच्या प्रचाराला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रचार केला होता.भाजप पराभवाकडे वाटचाल करत असतानाच बोम्मई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले बसवराज बोम्मई
इतकी मेहनत घेऊनही आम्ही छाप पाडू शकलो नाही. शेवटच्या टप्प्यातील निकाल आल्यानंतर आम्ही तपशीलवार विश्लेषण करू.एक राष्ट्रीय पक्ष म्हणून,आम्ही केवळ विश्लेषणच करणार नाही तर विविध स्तरांवर कोणत्या उणिवा राहिल्या हे देखील पाहणार आहोत.आणि लोकसभा निवडणूक ताकदीने लढवू असे बसवराज बोम्मई म्हणाले
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








