Jitendra Awhad On BJP : कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर असून बहुमताची आकडेवारी पार पाडेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. कर्नाटक निवडणुक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंगबली की जय म्हणत काँग्रेसविरोधात मतदान करा असे आवाहन मतदारांना केलं होतं. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. खुद्द बजरंग बली कोणासोबत आहेत दाखवून दिलं आहे अस म्हणत नाव न घेता नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले ट्विटमध्ये आव्हाड
कर्नाटक निवडणुकीचे निकाल यायला सुरवात झालीय.काँग्रेस स्पष्ट बहुमताने सरकार बनवत असल्याचं स्पष्ट होत आहे.
या निवडणुकीत भाजपने बजरंग बली अर्थात हनुमानाला निवडणुकीचा मुद्दा बनवला होता.परंतु खुद्द प्रभू हनुमानाला देखील ही गोष्ट आवडलेली दिसत नाहीये.
हनुमान चालिसा मध्ये एक कडव आहे.
“महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी..!”
अर्थात-
महावीर बजरंग बली हे पराक्रमी आहेत.
ते दुर्जनांच निराकरण करतात तर सज्जनांच्या सोबत उभे राहतात.
थोडक्यात आज खुद्द बजरंग बलीने देखील ते नेमके कोणासोबत आहेत हे कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने अवघ्या देशाला दाखवून दिले आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Previous Articleसावंतवाडीतील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचा सागर डान्स ग्रुप विजेता
Next Article महाडमध्ये मोहोत गावात फायरिंग;दोन गंभीर जखमी








