गडहिंग्लज प्रतिनिधी
गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील हिरण्यकेशी नदीवर असणाऱ्या भडगाव पुलावर शनिवारी सकाळी अश्विनी राहुल मुसळे (वय ३५ रा. हरळी खुर्द) या विवाहितेने आत्महत्या केली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गडहिंग्लज येथील डॉक्टर कॉलनीत राहणाऱ्या अश्विनी मुसळे या शुक्रवारी मध्यरात्री घरातून बाहेर पडल्या होत्या.शनिवारी सकाळी भडगाव पुल्ल्याच्या पूर्वेस कडेला विवाहितेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यानंतर गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अश्विनीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असून पोलिसानी घटनास्थळी पंचनामा केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.मयत अश्विनी त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.