Karnataka Election Result Live Updates : दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये बुधवारी (ता-10 ) रोजी मतदान झाले. 224 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. कर्नाटकात 65. 59 टक्के मतदान झाले. एकूण 224 जागासाठी झालेल्या या मतदानानंतर सरकार स्थापन्यासाठी बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता असणार आहे. यासाठी राज्यभरातील 2615 उमेदवारांचे राजकिय भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदानासाठी एकूण 42, 48,028 नवीन मतदारांची नोंदणी झाली होती.दरम्यान आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली.कर्नाटकमध्ये भाजप काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे.
निपाणी मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आघाडी घेतली असून भाजपच्या शशिकला जोल्ले, कॉंग्रेसचे काकासाहेब पाटील पिछाडीवर आहेत.उत्तम पाटील सध्या 777 मतांनी आघाडीवर आहेत.शिगगावमधून भाजपचे बोम्मई आघाडीवर आहेत.एकीकरणाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही.भाजप 97 तर काँग्रेस 106 तसेच डेडीएस 19
Previous Articleसंत मीरा शाळेसमोरील ड्रेनेज चेंबर खचले
Next Article वादळी पावसापूर्वीच हेस्कॉमने लक्ष देण्याची मागणी









