सेन्सेक्स 123 अंकांनी मजबूत : आयशर मोर्ट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील आठवड्यातील पाचव्या व अंतिम सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी तेजीसोबत बंद झाले आहेत. चालू आठवडा हा तेजी व घसरणीचा राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये शुक्रवारच्या सत्रात दिवसअखेर 123 अंकांची मजबूत स्थिती राहिली.
यामध्ये आयशर मोर्ट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांच्या कामगिरीचा लाभ हा बाजाराला झाला आहे. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 123.38 अंकांच्या मजबूतीसोबत निर्देशांक 62,027.90 वर बंद झाला आहे. याच्या विरुद्ध बाजूला राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी दिवसअखेर 17.80 अंकांनी वधारुन निर्देशांक 18,314.80 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 19 समभाग तेजीत तर 11 समभाग हे प्रभावीत होत बंद झाले आहेत. यावेळी मुख्य कंपन्यांमध्ये आयशर मोर्ट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचसीएल टेक आणि एचडीएफसी बँक मजबूत राहिले. तसेच निफ्टीत 21 समभाग तेजीत राहिले असून यात हिंडाल्को, बीपीसीएल, पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ.रे•ाrज लॅब आणि सिप्लासह 29 समभाग प्रभावीत राहिल्याची नोंद केली आहे.
बँक- वाहनाची कामगिरी
एनएसईमधील सर्व 11 क्षेत्रांचे समभागांपैकी 6 तेजीत तर 5 प्रभावीत राहिले आहेत. यावेळी बँक, वाहन, फायनाशिनल सर्व्हिसेस, एफएमसीजी, पीएसयू बँक आणि खासगी बँक या क्षेत्रात तेजीचे वातावरण दिसून आले आहे. तसेच धातू, औषध, मीडिया आणि रियल्टी हे मात्र घसरणीत राहिले. जागतिक पातळीवरील विविध घडमोडींमध्ये अमेरिका आणि चीन यांच्याकडून आर्थिक आकडेवारीचा अहवाल नकारात्मक आला असून यामुळे आर्थिक वृद्धीचा वेग काहीसा मंदावला असल्याचे संकेत मिळत आहे.









