विजेचे खांब, घरांचे पत्रे उडाल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान
सावर्डे (वार्ताहर)
सावर्डे (ता.हातकणंगले) परिसरात झालेल्या वादळी व्रायासह झालेल्या वळीवाच्या पावसाने सुमारे पंधरा घरांचे पत्रे उडून, झाडे उन्मळून पडून पडली.महावितरणचे खांबही पडून नुकसान झाले. वादळी व्रायाने अनेक नागरिकांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. पत्रे उडून लागल्याने मालन कांबळे, कल्पना कांबळे या दोन महिला जखमी झाल्या. वादळी व्रायाने झालेल्सुया नुकसानीत सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले.
सावर्डे परिसरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्य़ाने नागरिकांची तारांबळ उडाली. सावर्डे येथे मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी व्रायाने अवघ्या अर्ध्या तासात प्रचंड नुकसान झाले. वादळी व्रायात सावर्डे येथील अनेक घरांचे पत्रे उडून नुकसान झाले. यामध्ये महादेव श्रीपती कांबळे यांच्या घरातील प्रापंचिक साहित्यासह फ्रीज, विद्युत उपकरणे, पाण्याची टाकी, तिजोरी आदीसह अन्य साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घराचे पत्रे उडून या घरातील मालन महादेव कांबळे व कल्पना विकास कांबळे या दोन महिला पत्रा उडून अंगावर पडल्याने जखमी झाल्या. या दोघींना खाजगी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. दरम्यान ख्रिश्चन प्रार्थना हॉलचे पत्रे उडून गेले. तर विनायक वामन सावर्डेकर यांच्या घराचे पत्रे उडून गेले नुकतेच बांधकाम केलेले भिकाजी हिंदुराव कांबळे, राजाराम गणपती यादव यांच्या घरांचे छत उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. भगवान दादू कांबळे यांचे सिमेंटच्या विटामध्ये बांधलेले घर पूर्णत? उध्वस्त होवून नुकसान झाले. यासह मछीन्द्र कांबळे, प्रविण सावर्डेकर, रघुनाथ कांबळे, प्रविण चौगुले, मधुकर चौगुले आदीसह दहा ते पंधरा घरांचे, जनावरांचे गोठ्यांचे वादळी व्रायाने पत्रे उडाल्याने अनेक बांधकामेही पडून नुकसान झाले. एकंदरीत झालेल्या सर्व नुकसानीमध्ये सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सावर्डे-हातकणंगले रस्त्यावर व सावर्डे- नरंदे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने व विजेचे खांब रस्त्यावर उन्मळून पडून काही काळ वाहतूक खोळंबली. रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे व महावितरण कंपनीचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तीन तास अथक प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत सावर्डे येथील वीज पुरवठा बंद होता. महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.









