Bharat Gogawale : महाराष्ट्राच्या संत्तासंघर्षावर सुनावणी करत असताना आज सुप्रीम कोर्टानं महत्त्वाची तिन निरीक्षण नोंदवली आहेत. यामध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे पक्षप्रमुख भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली निवड बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं नोंदवलंय. याचबरोबर 16 आमदारांचा निकाल अध्यक्षांकडे देण्यात आला. सध्या महाराष्ट्रात शिंदे-भाजप सरकार असणार असल्याचं स्पष्ट झालयं. दरम्यान, भरत गोगावले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना गोगावले म्हणाले की, सुप्रीम कोर्टानं मत नोंदवलंय अजून निकाल येण बाकी आहे. निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया देणार असल्याचं मतं भरत गोगावले यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, कोर्ट जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेलं. माझी नियुक्ती बेकायदेशीर हे मत आहे निकाल नाही, असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








