पुणे / वार्ताहर :
सतत मोबाईल पाहत असल्याने वडील रागवल्याने बारावीतील तरुणीने घराच्या इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात घडली. भूमी सोनवणे (वय -19, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
भूमी बारावीत शिकत होती. तिचे वडील व्यावासायिक आहेत. बारावीचे वर्ष असल्याने तिला वडिलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर, असे सांगितले होते. सारखा मोबाइल पाहू नको, असे तिला वडील रागावले होते. वडील ओरडल्याने तिने थेट छतावरून उडी मारून आत्महत्या केली. सकाळी भूमी इमारतीच्या आवारात गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे सोनवणे कुटुंबीयांनी पाहिल्यावर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु उपचारांपूर्वीच तिचा दुर्देवी मृत्यू झाला होता. याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी घोडेगाव पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.








