दोडामार्ग – प्रतिनिधी
दोडामार्ग मधील खूनात गोवा कनेक्शन !
आपल्या पत्नीच्या असलेल्या अनैतिक प्रेम संबधांच्या रागातून गोव्यातून आपल्या पत्नीला दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथे आणून तिचा गळा दाबून खून करत दगडाने चेहरा ठेचून तिचा चेहरा विद्रुप करण्याची घटना काल रात्री मंगळवारी उघडकीस आली. दोडामार्ग पोलिसांनी या खुनाचा अवघ्या सहा तासात उलगडा करत या प्रकरणी मृत विशीता विनोद नाईक ( वय – 30 रा. वास्को ) या महिलेच्या खून प्रकरणी पती विनोद मनोहर नाईक ( वय – 40, मूळ रा. बेलबाय, वास्को गोवा, सध्या रा. पिंटो अपार्टमेंट, म्हरट, म्हापसा गोवा ) व ड्रायव्हर मित्र ऋतुराज श्रावण इंगवले ( वय – 25, मूळ रा. चंदगड फाटा, ता. चंदगड जि कोल्हापूर, सध्या रा. म्हापसा, मोहिरा चारीवाडो, म्हापसा गोवा ) यांना अटक केली आहे.









