ऑनलाईन टीम / तरुण भारत :
डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्यासह आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. हा अधिकारी गुप्तचर विभागातील आहे.
कुरुलकर यांनी अग्नी, ब्रम्होस, क्षेपणास्त्रविरोधी मिसाइलची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. कुरूलकर ज्या पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होते, त्याच महिलेच्या संपर्कात आणखी एक अधिकारी असल्याचे एटीएसच्या तपासात पुढे आहे. कुरुलकरच्या फोन कॉलच्या यादीत या अधिकाऱ्याचं नाव होते. तपासासाठी या अधिकाऱ्याचा मोबाईल एटीएसने ताब्यात घेतला. प्रत्यक्षात या अधिकाऱ्याने गोपनीय कागदपत्रे दिली का, याची माहिती एटीएस घेत आहे.
दरम्यान, या अधिकाऱ्यालाही एटीएसने ताब्यात घेतले असून, त्याचीही कसून चौकशी सुरू आहे. या अधिकाऱ्याकडे साक्षीदार म्हणून एटीएस पाहत असल्याचे सांगण्यात येते.