Vinayak Raut on Eknath Shinde : राजकीय पेच असलेली याचिका अखेर कोर्टात लिस्ट झाली आहे.त्यामुळे सुप्रीम कोर्टात आज याप्रकरणी सुनावणी होणार हे स्पष्ट झालं आहे. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे आमदारांचं निलंबन, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव यासह अनेक राजकीय गुंतागुंतीच्या जटील प्रश्नांवर महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे.याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना विनायक राऊत यांनी सांगितले कि दोन दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे सरकारला धडा शिकवणारा ठरेल. निकाल काहीही लागला तरी सरकार पडणार नाही असे जरी म्हटले जात असले तरी ‘गिर गए तो भी टाँग उपर’ अशी त्यांची अवस्था झाली आहे असेही राऊत म्हणाले.
पुढे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, सामनाच्या अग्रलेखांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची सुरुवात होते.संजय राऊत हे एक गाढा अभ्यासक आहेत असेही राऊत म्हणाले.महाविकास आघाडीचे दोन पक्ष शिवसेनेला महत्वाचे आहेत. तसेच वंचित आघाडी यांच्याशी झालेली चर्चा दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितली आहे.वंचित संदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय होवू शकतो.याबाबत पक्ष प्रमुखांवर संशय घेवू नये.आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्राधान्य देऊ.महाविकास आघाडी आम्हाला हवी म्हणजे हवी. देशातील हुकमी राजवट उलथून टाकायची असेल तर सर्वांना एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही असेही राऊत म्हणाले. नितिश कुमार त्यासाठीच मुंबईत येत असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,कर्नाटकातून भाजपला बोऱ्या बिस्तरा उचलावा लागेल. कन्नडीगांच्या आवाज काढणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.पण आत्ताचे मुख्यमंत्री आता कर्नाटकात भाजपच्या प्रचाराला जात आहेत ही महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी घटना आहे असेही ते म्हणाले.कर्नाटकातील निवडणुकीत मराठी माणसाला मतदान करा हा राज यांचा निर्णय चांगला आहे.बारसू बाबत दोन्ही भावांची भूमिका ही योग्य असल्याचे ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंवर टीका करताना ते म्हणाले की,बीजेपीची आणि आरएसएसच्या चिठ्ठीवर मुख्यमंत्री यांचे मुख्यमंत्री पद चालू आहे.भाजपच्या तालावर नाचणारे हे मुख्यमंत्री आहेत असेही विनायक राऊत म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








