न्हावेली / वार्ताहर
Heavy damage to dumper in triple accident at Malewad
सावंतवाडी -मळेवाड येथे तिहेरी अपघातात चार चाकीचे मोठे नुकसान झाले. मळेवाड जकातनाका येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर कळणेहून रेडीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने मळेवाडहून कळणेच्या दिशेने जाणाऱ्या डंपरला ठोकर दिली. त्यानंतर ठोकर दिलेल्या डंपरचे पाटे तुटल्याने समोरून येणाऱ्या चार चाकी ब्रिजा गाडीला डंपरने ठोकर दिली.यात चार चाकी चे मोठे नुकसान झाले.सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.सदरचे अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.उशिरापर्यंत अपघाताची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही.









