Kedar Shinde : राज्यात सध्या ‘द केरळा स्टोरी’ची जोरदार चर्चा सुरु आहे.भाजप नेत्यांकडून ठिक-ठिकाणी शोच मोफत आयोजन करण्यात येत आहे.शिवाय हा सिनेमा ट्रक्स फ्रि करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.त्याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्विट करत काही प्रश्न उपस्थित करत सिनेमाचे समर्थन करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
ट्विट करत केदार शिंदे काय म्हणाले,
दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का? असे संतप्त सवाल केदार शिंदे यांनी केले आहेत.
एकीकडे केरळा स्टोरीवरून आरोप- प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगतोय. तर दुसरीकडे मराठी सिनेमा थिएटरविना उपेक्षित राहत आहे.त्यातच केरळा स्टोरीला भाजप नेत्यांच्या प्रतिसादावरून केदार शिंदे यांनी राग व्यक्त केला आहे.
Previous Articleमोफत गणवेश, रेनकोटसह बचत गटांचे थकीत रक्कम द्या
Next Article कर्नाटकातील उमेदवारा विरोधात तक्रार दाखल








