शिवमनगर-गणेशपूर भागातील माजी सैनिकांनी घेतला म. ए. समिती उमेदवाराच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय
किणये ; देशाची सेवा केलेल्या शिवमनगर, गणेशपूर भागातील माजी सैनिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. या माजी सैनिकांच्या पाठबळ व समर्थनामुळे चौगुले यांचा प्रचार जोमाने झाला असून या भागात समितीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे चौगुले यांचा विजय निश्चित आहे, असे मनोगत माजी सैनिकांनी व्यक्त केले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना विविध भागातील माजी सैनिकांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये शिवमनगर, गणेशपूर, हिंडलगा, लक्ष्मीनगर, सरस्वतीनगर भागातील माजी सैनिकांचा समावेश आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती सर्वसामान्य लोकांसाठी झटणारी संघटना आहे. ग्रामीण भागात विविध योजना राबविणे गरजेचे आहे. लोकांच्या हितासाठी झटणारे आर. एम. चौगुले आहेत. त्यामुळे या प्रामाणिक उमेदवाराला निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू व चौगुले यांना विजयी करू, असे सांगितले. त्याचबरोबर स्वत: माजी सैनिकांनी समितीचे उमेदवार चौगुले यांना मतदान करा, असे आवाहन केले आहे.
वैभवनगरातून वाढता पाठिंबा
बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना वैभवनगर परिसरातून पाठिंबा वाढला आहे. या नगरातील नागरिकांनी चौगुले यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे. तसेच या भागातील अधिकाधिक मतदान समितीला करण्याचा ठाम निर्धार केला आहे. आर. एम. चौगुले हे समितीसाठी लाभलेले एक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेची ते नक्कीच चांगली सेवा करणार आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करून विधानसभेत पाठविणे आवश्यक आहे. यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने समितीचे चौगुले यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन प्रकाश बेळगुंदकर, अनंत पाटील, रमेश अष्टेकर, एस. आर. कालकुंद्री यानी केले. वैभवनगरातील मतदारांच्या घरोघरी जाऊन आर. एम. चौगुले यांचा प्रचार करण्यात आला. डी. एम. चौगुले, मधु बेळगावकर, परशराम कदम आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते









