वृत्तसंस्था/ केरळ
बोट उलटून सहा मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. केरळच्या मलप्पूरम जिल्ह्याच्या तानूर येथे रविवारी रात्री ही घटना घडली. केरळचे मंत्री व्ही. अब्दुर रहिमान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. पुरपूजा नदीकाठावरील तूवल तीर्थम या पर्यटनस्थळी सुमारे 30 ते 40 हून अधिक जण बोटीत बसले होते. क्षमतेपेक्षा अधिक जण बोटीमध्ये बसल्याने ती उलटल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेत 15 जण मृत्युमुखी पडले. 10 जणांना वाचविण्यात अग्निशामक दलाला यश आले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहेत. बोटीत पुरेशा प्रमाणात जीवरक्षक साधने नसल्याचे मृतांचा आकडा वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.









