सलग तीन वर्षे एखाद्या आजारामुळे आरोग्य आणीबाणी जाहीर राहण्याची ही पहिलीच प्रदीर्घ वेळ. शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेने ही आणीबाणी संपल्याचे जाहीर केले. यापूर्वी देखील जग सात वेळा सात आजारांच्या उद्रेकांना सामोरे गेले आहे. मात्र कोविडची झळ काही औरच होती. दरम्यान कोविड आरोग्य आणीबाणी हटवली म्हणजे कोविड संपला असा होत नाही. हे उमगूनच दिनचर्या ठेवावी लागणार आहे. त्यात मास्क वापरा न वापरा हे सांगणेसुद्धा प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्यातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही आणीबाणी पुन्हा न आणण्याचे आपल्याच हाती आहे.
2007 सालापासून आतापर्यंत संपूर्ण जगाने सात आजारांच्या उद्रेकांना तोंड दिले आहे. मात्र कोविड संसर्ग शारिरीक, मानसिक, आर्थिक तसेच सामाजिक पातळीवर हालवून गेला. हा हेलावून टाकणारा संसर्ग आता या पुढे नकोच अशा वैतागलेल्या मानसिक स्थितीतून प्रत्येक जण गेला. आजारांच्या सूचना देणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी कोविड आरोग्य आणीबाणी हटवल्याचे जाहीर केले. ही आनंदाची बातमी असली तरी आणीबाणी उठवली असली तरी देखील कोविड अद्याप संपला नसल्याने काळजी घेणे आवश्यक असल्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
शिवाय कोविडसोबत नवेनवे व्हेरिएंटचे आव्हानही आहेच. या सर्वांवर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींनीनी भाष्य केले. कोविड19 जागतिक आरोग्य आणीबाणी हटवण्यात आली असल्याची घोषणा आपत्कालीन समितीच्या पंधराव्या बैठकीत केली. यात कोविड 19 संसर्ग जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेबाहेर असल्याचे घोषित करण्याची शिफारस करण्यात आली. ही शिफारस स्वीकारल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी जाहीर केले. कोविड आरोग्य आणीबाणीबाबत जगाला माहिती असून 30 जानेवारी 2020 रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती. कोविड जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली त्यावेळी चीनमध्ये 100हूनही कमी कोरोना ऊग्ण आढळले होते. तसेच एकही मफत्यू झाला नव्हता. आता मात्र तीन वर्षांनंतर मागे वळून पाहता मृत्यूचा आकडा सुमारे 70 लाखांच्या घरात पोहोचला आहे. कोविड आणीबाणी हटवल्याच्या विषयावर बोलताना जागतिक आरोग्य संघटनेने काही मुद्दे स्पष्ट केले. त्याप्रमाणे गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रकरणांमध्ये झालेली घट ध्यानात घेऊनच जागतिक आरोग्य आणीबाणीतून कोरोना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा व्यापक दुष्परिणाम सर्व जगाने पाहिला. रोजगार गेले, व्यापार उदीम बंद पडले. शाळा तसेच कार्यालये या काळात बंद राहिले. यातून बहुतांश लोक नैराश्येच्या गर्तेत गेले. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. दरम्यान जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली असली तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे संपला नसून मागील आठवड्यात दर तीन मिनिटाला कोरोनामुळे एका व्यक्तीचा मफत्यू होत असल्याची माहिती देत जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी इशाराही दिला. त्यात कोरोनाचे नवे व्हेरिएंट येत असल्याने दुर्लक्ष कऊन चालणार नसल्याचे सांगितले आहे. कोविड मृत्यूची जागतिक स्थिती अशी असताना राज्यातही सरासरी किमान एक तरी कोविड मृत्यू नोंदविला जात आहे. 4 मे रोजी 4 मृत्यू नोंदविण्यात आले. तर गेल्या आठवडाभरातील कोविड मृत्यू नोंदीकडे लक्ष टाकल्यास दररोज किमान एक तरी मृत्यू नोंदविण्यात येत आहे. दरम्यान याकडे राज्यातील कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. वसंत नागवेकर यांचे मत ही आणीबाणी संपली, असे आहे. मात्र कोविड संपला नसल्याच्या विचाराला दुजोरा देणारे ठरले. जरी जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणी संपल्याचे म्हटले तरी पँडेमिक संपल्याचे ते म्हणाले नाहीत. त्यामुळे ही इमर्जंसी संपली मात्र स्टँडर्ड प्रिकॉशन सर्वांनी पाळावेत. सध्या ऊग्ण कमी आहेत. स्वाईन फ्ल्यूचे ऊग्ण ही नंतर तुरळक सापडू लागले. तसेच आता कोविडच्या ऊग्णांबाबत घडत आहे. कोविड कायमचा जाण्यासाठी बराच काळ जावा लागेल. ते लगेचच घडणारे नसल्याचे डॉ. नागवेकर यांनी स्पष्ट केले. आणीबाणी संपली म्हणजे कोविड प्रोटोकॉलचा प्रश्नच येत नाही. मात्र प्रत्येकाने आरोग्याचा विचार कऊन वैयक्तिक पातळीवर विचार करावा असे मत तज्ञांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान 2007 सालापासून जगाने आतापर्यंत सात जीवघेण्या संसर्गाचे उद्रेक पाहिले. त्या त्या वेळी आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्या आजाराच्या ऊग्णांची संख्या घटते तसे आणीबाणी काढून घेण्यात येते. आताच्या कोविडसह मंकीपॉक्स, झिका, एच1एन1 फ्लू, पोलिओ आणि इबोला असे हे आजार आहेत. त्या त्यावेळी टप्प्याटप्प्याने काळजी घेत आणीबाणी शिथिल करण्यात आली. याचवेळी आयुष टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुनिल लांबे यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी संपवल्याचा निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला हे समजणे आवश्यक आहे. कोविडमुळे जगाच्या सर्व व्यवहारांवर दुष्परिणामच झाला. आता ऊग्ण संख्या कमी होत असताना ही आरोग्य आणीबाणी संपवली याचे स्वागतच आहे. मात्र कोविड संसर्ग सुऊ झाला आणि त्या नंतर व्हेरिएंट आले. मात्र हे व्हेरिएंट क्षीण होत जाणार हे सर्वच तज्ञ बोलून दाखवत होते. मात्र त्याचवेळी व्हेरिएंट जोर कमी होत असताना मध्येच त्याचा प्रभावही दिसण्याची शक्यता डॉ. लांबे यांनी व्यक्त केली. एकूणच काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत मांडताना दिसून येतात. दरम्यान राज्यातही कोविड ऊग्णांच्या संख्येत घट सुऊ झाली असून मफत्यू दरातही घट झाल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल नुकताच आला आहे. राज्यातील कोविड19 ऊग्णांच्या संख्येत या आठवड्यात घट झाली असून, जिल्ह्dयांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे दैनंदिन कोरोनाबाधित ऊग्णांचा दरही कमी झाला आहे. कोविड19 मुळे होणारे मफत्यू रोखण्यासाठी सरकारची अद्यापही लढाई सुऊ आहे. त्यामुळेच या आठवड्यात मफत्यूदर 0.36 वरून घट होऊन 0.26 पर्यंत कमी झाला आहे. राज्यातील प्रयोगशाळांकडून आलेल्या माहितीनुसार, मागील आाठवड्यातील कोरोना बाधितांचा दर 6.3 होता, कोविड चाचणी तपासणीमध्ये या आठवड्यात दररोज सरासरी 14,500 तपासण्या केल्या जात आहेत. राज्यात ही स्थिती असताना कोविड आरोग्य आणीबाणी हटवल्याचा अर्थ विस्तृत सांगताना कोविड मृत्यू विश्लेषक समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, आणीबाणी हटवली म्हणजे आता आंतरराष्ट्रीय प्रवासी तसेच जागतिक पातळीवर दिलेल्या पॅन्डेमिकचे नियम कमी होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या ठिकाणांवर आजाराचे प्रमाण अधिक असेल त्यांनी कोविड नियम पाळण्याची गरज आहे किंवा व्हेरिएंटच्या संसर्ग तीव्रतेनुसारही वर्तणुक ठेवावी लागणार असल्याचे मत डॉ. अविनाश सुपे यांनी मांडले. तुर्तास कोविड गेलेला नाही. मात्र टप्प्याटप्प्यांची मोकळीक या घोषणेतून मिळेल. मोकळीक दिली म्हणजे कोविड संपला असा होत नसून जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी सात आजारांच्या आरोग्य आणीबाणी दरम्यान बहुतांश देशांनी अनुभवली आहे. त्यामुळे समजून दिनचर्या ठेवावी लागणार आहे. आताही मास्क वापरासाठी प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे.
राम खांदारे








