शतकांपासून चालत आली आहे परंपरा
विवाह अन् सोहळ्यांकरता मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येत असतात. यादरम्यान मौजमस्ती केली जाते, लोक एकत्र येत सोहळ्याचा आनंद घेत असतात. या सर्व लोकांकरता स्वयंपाक तयार केला जातो. परंतु यातील सर्वात अवघड काम उष्टी भांडी धुण्याचे असते. भारतात याकरता एक सोपी पद्धत आहे. आपल्या देशात मोठा समारंभ असला तर लोकांना केळीच्या पानांवर जेवण वाढले जाते. परंतु आता कृत्रिम प्लेट्स उपलब्ध असली तरीही ती पर्यावरणासाठी योग्य नसल्याचे मानले जाते.

सोशल मीडियावर मलेशियातील एका गावाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात विवाहानंतर प्लेट्स धुण्याची एक नवी पद्धत दिसून येते. येथे लोक उष्टी भांडी साबणाने धुत नाहीत, तसेच याकरता पाण्याचाही वापर करत नाहीत. अखेर ही प्लेट्स कशाप्रकारे साफ करतात असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे, प्रत्यक्षात या गावात उष्ट्या प्लेट्सना माती किंवा वाळूद्वारे साफ केले जाते.
ट्विटरवर यासंबंधी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ही पद्धत अत्यंत उपयुक्त असल्याचा दावा करण्यात येत आहे. यात अत्यंत सहजपणे भांडी स्वच्छ होत असतात. यासंबंधीची पोस्ट व्हायरल झाल्यावर लोकांमध्ये या पद्धतीविषयी स्वारस्य निर्माण झाले आहे. पूर्वीच्या काळात अशा पद्धतीनेच समारंभांमधील भांडी साफ केली जात होती असे एका व्यक्तीने नमूद पेले आहे. भांडी धुण्याच्या प्राचीन पद्धती आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.









