काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आश्वासन
बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागातील जनतेला विविध सरकारी सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. बेळगाव तालुका खूप मोठा आहे. तालुक्यातील शासकीय कार्यालयांवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा स्वतंत्र तालुका करण्याची गरज आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. यावेळी मी पुन्हा निवडून आल्यानंतर सर्वात आधी त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदारसंघातील जनतेला सर्व शासकीय कामांसाठी बेळगाव शहरात जावे लागते. यामुळे त्यांचा वेळ, मेहनत आणि पैसा वाया जातो. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य लोकांसाठी एक वेगळे कार्यालय स्थापन करून त्याच्या माध्यमातून लोकांना विविध शासकीय योजना पुरविण्यासाठी माहिती व सेवा देण्यात येणार आहेत, हा आपला उद्देश आहे, असे त्या म्हणाल्या.
सुनावणीच्या बैठका आयोजित करणार
लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावात, सर्व विभागांच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना बोलावून, 6 महिन्यांतून एकदा तरी सुनावणीच्या बैठका आयोजित केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे.









