प्रतिनिधी/ बेंगळूर
महाविद्यालयीन शिक्षणाची पायरी चढण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेच्या निकालाची हुरहुर लागली आहे. सोमवार दि. 8 मे रोजी सकाळी 10 वाजता राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी 11 वाजता शिक्षण खात्याच्या http://karresults.nic.in या वेबसाईटवर निकाल उपलब्ध केला जाईल.
कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन निर्णय मंडळामार्फत सोमवारी 2022-23 या क्षैक्षणिक वर्षातील परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला जाईल. राज्यात 31 मार्च ते 15 एप्रिल या कालाधीत दहावी परीक्षा पार पडली होती. एकूण 8 लाख 69 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.









