वृत्तसंस्था / जम्मू
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पोलिसांनी 5 किलो अत्याधुनिक स्फोटके जप्त करून निकामी केल्याने मोठी संभाव्य दुर्घटना टळली आहे. ही स्फोटके इश्फाक अहमद वाणी याच्याकडे सापडली आहेत. वाणी हा दहशतवाद्यांचा साहाय्यक असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
वाणी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून स्फोटकांची माहिती मिळविली जात आहे. तो अरिगामचा रहिवासी आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याची कोठडी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तीन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये एका स्फोटात पाच सैनिक हुतात्मा झाले होते. या पार्श्वभूमीवर स्फोटके निकामी करण्याची ही घटना महत्त्वाची मानण्यात येत आहे.
संघर्ष सुरुच
काश्मीर खोरे आणि सीमावर्ती भागात अद्यापही सेनेचा दहशतवाद्यांशी संघर्ष सुरुच आहे. राजौरी आणि पूंछ भागात सैनिकांनी गस्त वाढविली असून दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी अभियान चालविले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून काही दहशतवादी भारतात घुसल्याचा संशय आहे. त्यांना शोधण्यासाठी या भागाची नाकेबंदी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
उन्हाळ्यात घुसखोरीत वाढ एप्रिल-मे या काळात सीमावर्ती भागातील हिम उन्हाळ्यामुळे वितळत असल्याने डोंगर-दऱ्यांमधील मार्ग मोकळे होतात. त्यामुळे या काळात पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीचे प्रमाण वाढते. गेल्या कित्येक दशकांपासून हे घडत आहे. सध्याही 10 ते 12 प्रशिक्षित घुसखोर काश्मीर खोऱ्यात घुसले









