शोधमोहीम सुरू
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाच्या भद्रादी कोठागुडेम जिल्ह्dयात तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले आहेत. ही चकमक जिल्ह्dयातील पुट्टपुडु जंगलात झाली आहे. मृतांमध्ये कथिपपणे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) आयओएस कमांडर राजेशचा समावेश आहे.
तेलंगणात नक्षलवादीविरोधी सुरक्षा दल ग्रेहाउंडचे जवान जंगलात शोधमोहीम राबवत असताना ही चकमक झाली आहे. नक्षलवाद्यांना प्रथम शरणागती पत्करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने सुरक्षा दलाला प्रत्युत्तर द्यावे लागले. या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले तर अन्य घनदाट जंगलात पसार झाले आहेत. नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाईत कुठल्याही प्रकारची नरमाई न बाळगण्याची सूचना तेलंगणा पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती.









