कर्नाटकात काँग्रेस पुर्णपणे भयभीत झाली आहे असून कोणत्याही प्रकारचा खोटेपणा कॉंग्रेसच्या कामी येत नसल्याने त्यांनी आपल्या केंद्रिय नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रचारासाठी बोलावले असल्याचा आरोप सोनिया गांधी यांचे नाव न घेता केला. शिवमोग्गा येथील रॅलीद्वारे आपला निवडणूक प्रचार संपवत पंतप्रधानांनी अप्रत्यक्षरित्या सोनिया गांधीवर निशाणा साधला.
शनिवारी हुबळी- धारवाड येथील एका सभेला संबोधित करताना भाजपचे बंडखोर आणि काँग्रेस उमेदवार जगदिश शेट्टर यांच्यासाठी प्रचार केला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपवर “खोटेपणा” पसरवण्याचा आणि देशाची विभागणी केल्याचा आरोप केला. 76 वर्षीय सोनिया गांधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक रॅलीत सहभागी झाल्या नव्हत्या.
आपल्या प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले, “कर्नाटकात काँग्रेस घाबरलेली आहे. कॉंग्रेसने आपला खोट्या प्रचार इथे चालत नाही हे ओळखले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या केंद्र्य नेत्यांना कर्नाटकात बोलवले आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी होणाऱ्या पराभवाची जबाबदारी एकमेकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे” असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. आपल्या रॅलीदरम्यान, हनुमानाची मूर्तीसह भगव्या रंगाची पगडी घालून आलेल्या मोदींनी काँग्रेसचा “लबाडपणाचा फुगा” आता लोकांनी “फोडला” आहे.” असेही ते म्हणाले