ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खा. संजय राऊत 10 जून किंवा त्याआधीच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्यासाठी संजय राऊत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ देत नाहीत. संजय राऊत 10 जून किंवा त्यापूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश करतील. यासंदर्भात त्यांच्या बैठकाही झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे काही खरं नाही. त्यांचा स्वत:चा पक्ष राहीला नाही. उद्धव ठाकरे मला परत खासदार बनवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्यात काही रस नाही, अशी भूमिका राऊतांनी घेतली आहे. मागील काही दिवसात राऊतांची भूमिका अजित पवारांविरोधातही आहे. त्यांची अशी देखील मागणी आहे की, अजित पवार गेले की, मी पक्षात प्रवेश करेन.
उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊत यांचा कट आहे. शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्या दिवशी उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना राजीनामा मागे घ्यावा, म्हणून भेटायला जाणार होते. परंतु, ते गेले नाहीत. किंबहुना संजय राऊत यांनी भेट घेऊ दिली नाही, असेही राणे यांनी सांगितले.