आंबोली / प्रतिनिधी
After falling into a deep valley in Amboli Ghat, c. AF jawan’s death!
आंबोली घाटात मुख्य धबधब्या पासून शंभर मीटर अंतरावर तीनशे फूट खोल दरीत पडून छत्तीसगड दंतेवाडा येथील सी .ए.एफ .( छत्तीसगढ आर्म फोर्स ) चे जवान मिथिलेशकुमार राजेनराम पॅकेरा वय ३५ याच्या मृत्यु झाला. हे पोलीस कर्नाटक निवडूकीतील बंदोबस्तासाठी रायबाग तालुक्यात आले होते . यातील पाचजन खासगी गाडीने गोवा पर्यटन सफारीसाठी गेले होते . गोवा पर्यटन सफर करून येताना वाटेत आंबोली घाटातच जवान मिथीलेशयांचा दरीत कोसळून मृत्यु. झाला . घटनेची माहीती मिळताच आंबोली पोलीस, आणि रेस्क्यू टीमचे सदस्य अवघ्या पाचच मिनिटांत घटना स्थळी दाखल झाले.
छत्तीसगढ दंतेवाडा येथील सी ए एफ जवानांची एक तुकडी कर्नाटक निवडणुक बंदोबस्तासाठी रायबाग तालुक्यात तैनात करण्यात आली होती. बंदोबस्त झाल्यावर त्यातील मिथिलेशकुमार पॅकेरा आणि त्याचे चार सहकारी पर्यटनासाठी आंबोली मार्गे गोवा येथे निघाले होते पुन्हा गोवा येथून बेळगाव रायबेरी येथे जाताना वाटेत आंबोली घाटात मुख्य धबधब्यापासून साधारण शंभर मीटर अंतरावर मिथिलेश याने लघूशंकेसाठी गाडी थांबवीली आणि खोल दरीच्या बाजूने तो काळोखातच लघूशंकेला गेला त्याला तेथील अंदाज न आल्याने आणि कदाचित त्याचा पाय घसरून तो खोल तीनशे फुट खोल दरीत कोसळला तो कोसळताना त्याच्या तोंडाला मार लागता होता. त्याच्या तोंडातून रक्त येत होते.घाटात खोल दरीत खाली एक माणूस पडल्याची माहीती आंबोली पोलीसांना मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे ठाणे अंमलदार हवालदार दत्तात्रय देसाई, हवालदार दिपक शिंदे, आंबोली रेस्कू टीमचे दिपक मेस्त्री, अजित नार्वेकर, मायकल डिसोजा, ऊत्तम नार्वेकर, संतोष पालेकर, प्रथमेश गावडे, हेमंत नार्वेकर, विशाल बांदेकर, राजु राऊळ, आणि बाजारवाडी ग्रामस्थ घटना स्थळी रवाना झाले.









