सांबरा/वार्ताहर
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ बसरीकट्टी येथे काढलेल्या प्रचारफेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रचारफेरीची सुरुवात बसस्टँडजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आली. नागेश मनोळकर यांनी शिवमूर्तीचे पूजन करून लक्ष्मी मंदिरात पूजन करून प्रचारफेरीला चालना देण्यात आली.
प्रचारफेरी लक्ष्मी गल्ली, बसवाण गल्ली, शिवाजी गल्ली, तानाजी गल्लीमार्गे संभाजी गल्ली येथे आल्यानंतर प्रचारफेरीची सांगता झाली. प्रचारफेरीदरम्यान ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेऊन भाजपालाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रचारफेरीमध्ये भाजपाचे बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, भाजपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, भाजपा ग्रामीण मंडळचे खजिनदार विकास देसाई, तानाजी चौगुले, सागर शेरेकर, निलेश देसाई, अमोल शेरेकर, सोमनाथ देसुरकर, गजानन कोंडस्कोप, नागेंद्र बिरजे, रामा सांबरेकर, मोहन चौगुले, अरुण कोलकार, ज्योतिबा सांबरेकर, सुधीर जक्काणे, यल्लाप्पा मुचंडी, राजू कोंडुस्कोपसह कार्यकर्ते उपस्थित होते.









