‘ऑपरेशन कावेरी’ पूर्ण झाल्याची परराष्ट्रमंत्र्यांची माहिती
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी राबविण्यात आलेली ‘ऑपरेशन कावेरी’ मोहीम पूर्ण झाली आहे. या माहिमेंतर्गत सुदानमधून 3,862 नागरिकांना सुखऊप मायदेशात आणले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना दिली आहे. सुदानमधील हिंसाचारात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखऊप परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुऊ केले होते. या मोहिमेतील भारतीय वायुसेनेचे शेवटचे विमान 47 प्रवशांना घेऊन शुक्रवारी 5 मे रोजी मायभूमीत परतले. सुदानमध्ये लष्करी आणि निमलष्करी दलामध्ये सुऊ असलेल्या हिंसाचारातून भारतीय नागरिकांना मायभूमीत परत आणण्यासाठी 24 एप्रिल रोजी ही मोहीम भारताने सुऊ केली होती. या मोहीमेत भारताला सौदी अरेबियाची मोठी मदत लाभली.
भारतीय वायुसेनेच्या 17 विमानांनी सुदानमधून उ•ाण करत सौदी अरेबियाच्या जेद्दाह विमानतळापर्यंत भारतीयांना सुखऊप पोहचवण्यासाठी जवळपास पाच फेऱ्या मारल्या आहेत. भारतीय नागरिकांना सुरुवातीला सुखऊपपणे सौदी अरेबियामध्ये पोहोचवण्यात आले होते. तेथून हवाई मार्गाने सर्व भारतीय नवी दिल्ली, मुंबई, बेंगळूर येथे दाखल झाले होते.









